पत्नीला अश्लील मेसेज केल्यामुळे साला आणि भाच्याच्या मदतीने काढला काटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गंगापूर तालुक्यातील कदीम टाकळी येथील तरुणाने साला आणि भाच्याच्या मदतीने त्याच्याच गावातील एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विकास रावसाहेब थोरात (25) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 14 जुलै रोजी विकासचा मृतदेह आरापूर शिवारातील विहिरीत आढळला होता. आरोपीच्या पत्नीला मृत विकास सतत फोनवर अश्लील बोलून त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याने हा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदीम टाकळी येथे राहत असलेले संजय बाबूराव थोरात (37),अनिकेत सुधाकर आव्हाड (21) आणि बाळू माणिक नितनवरे (रा. क्रांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मृत विकासचा मृतदेह आरापूर शिवारातील विहिरीत आढळला होता. त्याचा शरीरावर जखमा असल्याने त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह विहिरीत टाकल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी सिल्लेगाव पोलीस ठाण्यात रावसाहेब थोरात यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, हवालदार विठ्ठल राख, दीपेश नागझरे, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, गणेश गांगवे, संजय तांदळे, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, यांनी या खुनाचा शोध घेतला.

आरोपी संजय थोरात याच्या पत्नीला मयत विकास हा फोनवरून अश्लील बोलत होता. त्यामुळे संजयने त्यास समज दिली होती. परंतु त्यानंतरही त्याच्याकडून त्रास देणे सुरूच होते. याप्रकरणी संजय आणि अनिकेत आव्हाड यांची कसून चौकशी केल्यानंतर हा खून त्यांनी केला असल्याचे समोर आले. समज देऊनही त्रास देत असल्यामुळे मी माझा साला बाळू आणि भाचा अनिकेत यांना बोलावून घेऊन विकासला कायमचे संपवण्याचे ठरवले. त्यानुसार 9 जुलै रोजी आरापूर शिवारातील शेतात आम्ही तिघे असताना विकासला आवाज देऊन बोलावून घेतले. तेथेही तो आम्हाला धमकी देऊ लागल्याने मी त्याचा दोरीने गळा आवळला, अनिकेतने दगडाने मारले तर बाळूने गुप्तांगावर आणि अन्य ठिकाणी लाथाबुक्क्याने मारहाण केली. यामध्ये तो ठार झाला.

Leave a Comment