अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी मामाला अटक

कराड पोलिसांनी घेतले ताब्यात : आरोपींची संख्या झाली 3

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील एका गावात स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची घटना रविवार, दि. 1 मे रोजी समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई व वडिलांना अटक केली होती. आता या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो अल्पवयीन मुलीचा मामाच असल्याचे समोर आले आहे. आता आरोपींची संख्या तीन झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी हॅलो महाराष्ट्राचा Whatsapp ग्रुप जॉईन करा (Click Here)

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दि. 17 एप्रिल रोजी कराड पोलिस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु असताना मुलीच्या वडिलांकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत मुलीच्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे प्रेम प्रकरण असल्यानेच आपण तिचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडील आणि आईला ताब्यात घेतले होते.

या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर या खून प्रकरणात मुलीच्या मामाचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या मामालाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.