तुमचं पत्र राजभवनाचा अपमान आणि बदनामी करणारे; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना तिखट प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारच्यावतीने केला गेला. मात्र, राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पत्र दिलेल्यां त्यानंतर अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया थांबविण्यात आली. राज्यपालांनी पाठविलेल्या पत्रात नेमके काय लिहले आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. “काल मला पाठविलेल्या पत्रात वापरण्यात आलेली भाषा योग्य नाही. तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं आहे. तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही, असे उत्तर राज्यपालांनी आपल्या पत्रातून दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात राज्यपाल यांनी म्हंटले आहे की, काल मला अध्यक्ष निवडीच्या विषयावरून जे काही पत्र पाठविण्यात आले. त्या पत्रात वापरण्यात आलेली भाषा योग्य नाही. हे पत्र वाचून मी खूप दु:खी, व्यथित आणि निराश झालो आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मला पाच वाजता पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर लगेच एका तासात मंजूरी द्यावी, अशी मागणी सरकारने केली. हा माझ्यावर एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रकार आहे.

मी घटनेच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करुन मला निर्णय घ्यावा लागतो. विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला मंजुरी देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी घटनेतील कलम 208 चा गैरवापर करण्यात आला. ते घटनाबाह्य आहे. त्यामुळे मी सध्या विधानसभाध्यक्षाची निवडणूक घेण्यास अनुमती देऊ शकत नाही, असे राज्यपालांनी पत्रात म्हंटले आहे.

Leave a Comment