नातवांनी आजीचे डोके फोडत अंगावरील सोने लुबाडले

हिंगोली : आजी आणि नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना हिंगोली येथून उघडकीस आली आहे. नातवांनी आजीच्या डोक्यात रॉड घालून डोके फोडले त्याचबरोबर त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून पळवण्याची घटना घडली आहे.

रुक्मिणीबाई सदाशिव गाढवे असे या आजीचे नाव असून सेनगाव येथे त्या त्यांच्या 2 नातवांसोबत राहत होत्या. तू विकलेल्या जमिनीचे पैसे आम्हाला दे अशी मागणी या नातवांनी केली होती. या मागणीला आजीने विरोध केल्यामुळे नातवंडांनी तिच्या अंगावरील सोने काढण्यासाठी झटपट केली. त्याचवेळी एका नातवाने लोखंडी रॉड आजीच्या डोक्यात घातला. एवढेच नाही तर काठीने पाठीत आणि पोटात मारून त्यांना दुखापतही केली.

हाती आलेल्या माहितीनुसार, या अगोदरही मी तुम्हाला पैसे दिले होते. आता माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा त्यांनी तुझ्या अंगावरील चांदीचे कडे आम्हाला काढून दे अशी मागणी केली. परंतु आजी ऐकत नसल्यामुळे त्या दोन्ही नातवांनी तिला मारहाण केली. आणि पोलिसात तक्रार केल्यास जिवे जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like