कोरोनामुळे दवाखाने बंद, महिलेने पतीच्या मदतीने कारमध्येच दिला बाळाला जन्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक साथीच्या कोरोना विषाणूमुळे जगभरातील आरोग्य सेवांवर परिणाम झालेला आहे. यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचणी येत आहेत. असाच एक प्रकार इंग्लंडमध्ये समोर आला आहे, जेथे वेळेवर डॉक्टर न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेने कारमध्येय बाळाला जन्म दिला.इंग्लंडमधील हॅम्पशायर येथे शिक्षिका असलेल्या हन्ना हॉव्हेल्स यांना प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते.परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांना जानवले की मुल बाहेर येत आहे.त्यानंतर त्यांनी आपला पती अँडीला कुठेतरी गाडी पार्क करण्यास सांगितले.नवरा तिला शहरातील सुपर मार्केटच्या पार्किंगमध्ये घेऊन गेला.

जेथे हन्नाने गाडीच्या सीटवरच बाळाला जन्म दिला.खरं तर,जेव्हा हन्नाला वेदना सुरू झाल्या तेव्हाच अँडीने आपत्कालीन क्रमांक डायल केला आणि मदत मागितली.कॉल हँडलरने अँडीचे ऐकले आणि परिस्थिती पाहून फोनवरुनच आवश्यक त्या सर्व सूचनांची जाणीव करुन दिली. महिलेच्या नवऱ्याला रुग्णालयात पोहोचण्यास वेळ होत होता,म्हणून त्याने कॉल हँडलरने सांगितल्याप्रमाणे हे केले.अँडीने बाळाच्या जन्मानंतर कॉल हँडलरचे आभार मानले आणि सांगितले की त्यांच्याशिवाय त्याला काहीही करता आले नसते. ते म्हणाले की हे असे करणे आश्चर्यकारक आहे.

बाळाच्या जन्मानंतर पॅरामेडिकल स्टाफ घटनास्थळी दाखल झाले आणि हन्नाला रुग्णालयात नेण्यात आले.रुग्णालयात तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.हन्ना म्हणाल्या की आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी पार्किंगमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला,कारण जर आम्ही असे केले नसते तर धोका वाढू शकला असता.

त्याच वेळी अँडीने सांगितले की जेव्हा तो मदतीसाठी कारमधून बाहेर पडला, तेव्हा राष्ट्रीय आरोग्य सेवेची एक रुग्णवाहिका समोरून गेली आणि त्यांनीही मदतीचा हात दिला.परंतु रुग्णवाहिकेत बसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना असे वाटले की कोरोनादरम्यान ते जे काही करीत आहात त्याबद्दल मी त्यांच्या स्तुतीमध्ये हात हलवित आहे आणि त्यामुळे ते निघून गेले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment