Sunday, April 2, 2023

भुकेल्या मोराला भाजीवाल्या आजींनी ‘अशी’ केली मदत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाउन चा काळ असल्याने सर्व ठिकाणी शुकशुकाट होता. कोणी घराच्या बाहेर नसल्याने अनेक प्राणी मोकळ्यापणाने इकडे तिकडे वावरत होती. अनेक ठिकाणी तर जंगलातील प्राणी गावच्या जवळ आले होते. अनेकांनी आपापल्या परीने त्यांना मदत केली. काही ठिकाणी पर्यटन व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या अनेक प्राण्याचे हाल झाले. अशीच काहीशी घटना एका मोरोसोबत घडली. तहानेने आणि भुकेने व्याकुळ झालेल्या मोराला एका वयस्कर आजीने पाणी आणि खायला दिले. त्याच्या या उदारपणाचे कौतुक होत आहे त्याचा हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला आहे.

या वायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक मोर भुकेल्या अवस्थेत त्या भाजीवाल्या आजींपाशी येतो त्या आजींना त्याला काय हवे ते लगेच कळते आणि त्यांनी आपल्या जवळ असलेलं काही तरी त्याला खायला भरवताना चा व्हिडीओ दिसत आहे. या व्हिडीओ ला अनेक जणांनी लाइक केले आहे. असेच अनेकांनी कंमेंट करून आजींचे कौतुक केले आहे. रस्त्याच्या एका कडेला भाजीचे दुकान त्या आजींचे आहे . मोराच्या भावना त्यांना लगेच समजल्या आणि त्यांनी आपल्या हातातील दाणे त्याच्या दिशेने पुढे केले. एक एक करत त्या मोराने सारे दाणे संपवले. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी हा व्हिडीओ काढला तसेच त्यांचे फोटो काढूनही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

- Advertisement -

 

टिंकू व्यंकटेश याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ला आत्तापर्यत ५ लाख लोकांनी पहिला आहे. ५ हजारा पेक्षा जास्त लोकांनी त्याला लाइक केले आहे. तर १००० पेक्षा जास्त लोकांनी तो शेअर केला आहे. हि महिला गरीब असली तरी ती मात्र मनाने फार श्रीमंत आहे अश्या अनेक कौतुकास्पद कंमेंट्स आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.