क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय ! त्यासंबंधित महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काही काळापूर्वीपर्यंत तरुणांच्या मनात गुंतवणूक करत असताना केवळ शेअर बाजाराचेच नाव येत असे. गेल्या काही काळापासून क्रिप्टोकरन्सीजने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे आणि नवीन गुंतवणूकदारदेखील आता याबाबत विचार करू लागले आहेत. आतापर्यंतच्या प्रवासात क्रिप्टोकरन्सीजने टीका आणि कौतुक दोन्ही मिळवले आहेत. त्याचे टीकाकार असे म्हणतात की,” क्रिप्टोकरन्सी एक अतिशय अस्थिर एसेट क्लास आहे.” यासंदर्भात जगभरातील नियमांमध्ये स्पष्टता नाही. यासह यामध्ये सायबर क्राइमचा धोका देखील असून त्याचे भविष्यही अनिश्चित आहे. दुसरीकडे, त्याचे चाहते म्हणत आहेत की, या क्रिप्टोकरन्सींनी गेल्या काही वर्षांत इतका जबरदस्त रिटर्न दिला आहे की, हे इतर कोणत्याही एसेट क्लासमध्ये शक्य नाही.

हा नवीन मालमत्ता वर्ग असल्याने. म्हणूनच, त्याच्या मूलभूत विश्लेषणासाठी जास्त माहिती उपलब्ध नाही. म्हणूनच क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे महत्वाचे ठरते. क्रिप्टोकरन्सीजच्या ट्रेडिंगमध्ये कोणती खबरदारी घ्यावी लागेल ते जाणून घेउयात …

मोठी गुंतवणूक करणे टाळा
गेल्या काही वर्षांमध्ये क्रिप्टोमध्ये गुंतविलेल्या पैशातून अनपेक्षित उत्पन्न मिळाले आहे. त्यात केलेली काही हजार रुपयांची गुंतवणूक दोन वर्षांच्या कालावधीत लाखो रुपयांमध्ये बदलली आहेत. ही उच्च वाढ आपल्याला क्रिप्टोमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास उद्युक्त करू शकते. परंतु आपण असे करणे टाळावे. क्रिप्टो हा अत्यंत अस्थिर मालमत्ता वर्ग आहे. कोणत्याही किंमतीची दखल न घेता त्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली येऊ शकतात. अलीकडेच, जसे टेस्लाने बिटकॉइनबाबत यू-टर्न घेतला आणि चीनी सरकारने क्रिप्टोकरन्सीजची खरेदी करणार्‍या संस्थांवर कडक कारवाई केली, त्यावेळी हे क्रिप्टो मार्केट कोसळले. हे लक्षात ठेवूनच एकाच वेळी क्रिप्टोमध्ये प्रचंड रक्कम गुंतवू नका.

केवळ एखाद्या सुप्रसिद्ध प्लॅटफॉर्मद्वारे पैसे गुंतवा
हे लक्षात ठेवा की, क्रिप्टो स्पेस भारतात रेगुलेटेड नाही आहे. येथे आपल्याला अनेक लहान लहान प्लॅटफॉर्म सापडतील, जे क्रिप्टोमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला देतात. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जसे आपण एक चांगला ब्रोकर निवडतो तसेच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना देखील एक चांगला क्रिप्टो प्लॅटफॉर्म निवडा. या व्यतिरिक्त आपण ज्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित आहात त्या क्रिप्टो करन्सीबद्दल सखोल रिसर्च करा. जरी Bitcoin सर्वात लोकप्रिय असला तरी या व्यतिरिक्त, मार्केटमध्ये Dogecoin,Ethereum, Cardano, Ripple आणि Litecoin देखील आहेत.

विचार न करता गुंतवणूक करु नका
आतापर्यंत या मालमत्ता वर्गात गुंतवणूक न करून संधी गमावल्यामुळे आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करु नका. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, याची खात्री करा की, आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी अंदाजावर नव्हे तर तथ्यावर आधारित असेल. लक्षात ठेवा की, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मुख्यतः सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आधारित असतात. अपुऱ्या माहिती वर केलेली अशी गुंतवणूक म्हणजे हेतूपूर्वक अडचणीत पडण्यासारखे आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment