व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

CCTV कॅमेऱ्यात कैद : कलेढोणला मध्यरात्री ज्वेलर्सचे दुकान फोडले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मायणी येथील कलेढोण गावात ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. बुधवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली आहे. या चोरीचा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबधित सीसीटीव्हीतील व्हिडिअो पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासास सुरूवात केली आहे. सीसीटीव्हीत 3 चोरटे दिसत आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मायणी पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कलेढोण गावात चोरीचा प्रकार घडला आहे. गावातील पूजा ज्वेलर्स हे दुकान बुधवारी रात्री पावणे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडले. याबाबतची फिर्याद ज्वेलर्स मालक शंकर पावणे यांनी पोलिसात दिली आहे.

फिर्यादीत चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील 10 ग्रॅम मोडीचे सोने आणि 7 किलो चांदीचा ऐवज चोरीस गेला असल्याचे म्हटले आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत दुकानमालक शंकर पावणे यांच्या तक्रारीवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत..