Wednesday, October 5, 2022

Buy now

बगाड यात्रा : जिंती येथील 300 वर्षाची परंपरा असलेली जितोबाची यात्रा उत्साहात

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जिंती गावची श्री जितोबा बगाड यात्रा गुलाल-खोबरे यांची उधळण करीत भक्तीमय वातावरणात पार पडली. सुमारे 300 वर्षांची परंपरा ग्रामस्थांनी जोपासून ठेवली आहे.

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून यात्रा-जत्रा यांवर राज्य शासनाने बंदी घातली होती. जिल्हा निर्बंधामुक्त झाल्याने ग्रामीण भागामध्ये यात्रा सुरू झाल्या आहेत. फलटण तालुक्यातील जिंती गावची प्रसिद्ध जितोबा देवस्थानची बगाड यात्रेमध्ये हराळी वैष्णव मठातून वाजत गाजत गुलाल-खोबरे उधळत “जितोबाच्या नावाने चांगभले” असा जयघोष करत उत्साहात पार पडली.

बगाडाचे प्रमुख मानकरी दिलीप रणवरे यांना हे होते. जितोबा देवाची ही परंपरा तीनशेहून अधिक वर्षांपासून अखंड चालूच आहे. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने अनेक भाविक जितोबा देवाच्या दर्शनासाठी येत असतात. कालाष्टमी पासुन यात्रेस प्रारंभ होतो. जिंतीचे बगाड हे फलटण तालुक्यात प्रसिद्ध आहे. यावर्षीही हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित यात्रेत सहभागी झाले होते.