पृथ्वीवर कोरोना असताना ‘या’ देशाची चंद्राकडे झेप; मिशन मूनला भारतचा हातभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या संकटाच्या दरम्यान भारत आणि जपान हे एकत्रितपणे चांद्रयान मिशन सुरू करण्याची तयारी करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या मोहिमेचे नेतृत्व करेल. जपानच्या अंतराळ संस्था JAXAच्या म्हणण्यानुसार हे अभियान २०२३ नंतर सुरू केले जाईल. त्याशिवाय २०२२ मध्ये इस्रोचा आणखी एक ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम (मानवी अभियान) देखील सुरू केला जाऊ शकतो. याला गगनयान असे नाव देण्यात आले आहे.

२०१७ मध्ये पहिल्यांदा झाली होती चर्चा
या मोहिमेबाबत दोन्ही देशांमध्ये २०१७ मध्ये पहिल्यांदा चर्चा झाली होती. बंगळुरुमध्ये या मल्टी स्पेस एजन्सींमध्ये संभाषण झालेले होते. आतापर्यंत जपानला असे कोणतेही अभियान करता आलेले नाही आहे. भारत आणि जपानचे हे अभियान पूर्णपणे रोबोटिक असेल. हे अभियान चंद्रावर बेस बनवण्यासाठीचे ग्राउंड वर्क असू शकेल. यामध्ये जागतिक अंतराळ संस्थांची देखील मदत घेतली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या वर्षीच इस्रोचे अध्यक्ष एएस किरण कुमार यांनी सांगितले होते की,’ भारत आणि जपान हे एका संयुक्त चंद्र अभियानाचा विचार करीत आहेत. तसेच, दोन्ही देशांनी हवामान बदलाच्या देखरेखीची माहिती शेअर करण्याची आणि एकमेकांचे अवकाश विभाग वापरण्याची परवानगी द्यायला सहमती दर्शविली आहे. किरण कुमार यांच्या मते, ‘आम्ही हया संभाव्य संयुक्त चंद्र अभियानासाठी भविष्याकडे पहात आहोत. भविष्यात आम्ही हवामान बदलाच्या अभ्यासासाठी अधिक इनपुट कसे वापरू शकतो ते पाहू.’

चंद्रयान -२
याआधी भारताला आपल्या महत्त्वाकांक्षी मिशन चंद्रयान २ मध्ये ९५ टक्के यश मिळाले होते. मात्र अगदी शेवटच्या क्षणी एजन्सीचा विक्रम या लँडरशी असलेला संपर्क तुटला. यानंतर, यूएस स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने विक्रम लँडरबद्दल मोठा खुलासा केला. नासाच्या लूनर रेकनाइन्स ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान -२ विक्रम लँडरच्या तुटलेल्या पार्ट्सचा शोध घेतला होता. या चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरचा तुटलेला भाग हा अपघातस्थळापासून ७५० मीटर अंतरावर सापडला होता. याबाबत नासाने ट्वीटद्वारे माहिती दिली होती. नासाने विक्रम लँडरचे हे तुटलेले भाग शोधण्यासाठीचे क्रेडिट चेन्नईच्या एका अभियंत्याला दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment