तिप्पट पैश्याचे अमिष : युवकांना फसवणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी

कराड | ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मसूर व उंब्रज येथील युवकांना 42 लाख 36 हजारांना गंडा घालणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनील नवीनचंद्र रूबाला (वय- 32, रा. याजू पार्कजवळ, विरार) व यशवंत विजय नारायण यादव (वय- 30, रा. आकुर्डी रोड, हनुमाननगर, कांदिवली, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक चंद्रशेखर वेल्हाळ (रा. मसूर) यांनी याबाबत फिर्यादी दिली होती. त्यांना 1 जानेवारी 2021 मध्ये वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून ट्रिनिटी एफएक्स व एफएक्स या ट्रेंडिंग माहिती सांगण्यात आली. त्यांनी त्यांचे कंपनीचे अकाउंट नंबर फोनवर पाठवले. वेळोवेळी पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवलेले पैसे दोन महिन्यांमध्ये तिप्पट होतील, असे सांगितले. माझे मित्र सचिन प्रकाश जगदाळे, आनंदा सदाशिव जगदाळे, मोहन प्रकाश जगदाळे (सर्व रा. मसूर), दिग्विजय पांडुरंग मराठे (रा. उंब्रज) यांच्याशीही संबंधित कंपनीच्या अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले.

संबंधितांना सर्व व्यवहार अॅपच्या माध्यमातून फोनवर दिसत होते. मात्र, अचानक जुलै 2021 महिन्यांमध्ये अॅप अचानक बंद झाले. त्यावर मी व मित्रांनी संबंधित फोन नंबरवर वारंवार संपर्क साधला; परंतु त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधिताविरोधात फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.