दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले ; चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | रक्तदाब आणि मधुमेह चा आजार असल्याने दार उघडे करून घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या एका 47 वर्षीय महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून चोरट्यानी पळ काढला ही घटना आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास पुंडलीकनगर भागातील न्यु-हनुमाननगर मध्ये घडली.मात्र चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

कौशल्या रघुनाथ जाखड यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे. उन्हाळ्यात त्रास होत असल्याने, त्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा उघडा ठेऊन पती, मुले असे घरात झोपले होते.मात्र रात्री दोन वाजेच्या सुमारास झोपेत असताना तीन चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील सुमारे आठ ग्रामचे मंगळसूत्र ओरबाडले गळ्याला झटका बसल्याने त्यांना जाग आली.व त्यांनी आरडाओरड केली.मात्र तो पर्यंत चोरटे जिन्याच्या मार्गाने गच्चीवरून उडी घेत पसार झाले.त्यांचा जाखड दाम्पत्याने पाठलाग केला मात्र रात्रीच्या अंधार आरोपी पसार झाले.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.पोलिसांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत. घटनास्थळावरून चोरट्यांची चप्पल जप्त केली.व परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्या मध्ये तिंघे आरोपी कैद झाले आहे. पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत.

जाखड यांच्या घराला चिटकूनच दुसऱ्या घराचा बांधकाम सुरू आहे.त्या घरावरून चोरट्यानी गच्चीवर प्रवेश करीत जिन्यावरून खाली दुसऱ्या मजल्यावर आले होते.आणि मंगळसूत्र हिसकावून त्याच मार्गाने चोरटे पसार झाले आहे.या परिसरातील अशाच पद्धतीची ही तिसरी घटना असल्याचे रहिवाशी सांगतात मात्र यापूर्वी दोन्ही घटनेत तक्रार देण्यास कोणीही पुढे आले न्हवते.त्यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढत गेली.

 

Leave a Comment