मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा 13 वा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून आज ”भारत बंद”ची हाक देण्यात आली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आणि अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर, मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. रोज लागणाऱ्या दूध, फळ आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर या भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे.
प्रयागराज: समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुंदेलखंड एक्सप्रेस रोखली
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुंदेलखंड एक्सप्रेस रोखली आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर बसून कृषी कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे.
बिहारच्या वैशालीमध्ये वधू-वर अडकले!
बिहारमधील वैशालीच्या भगवानपूरमध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग 22 जाम केला आहे. त्यामुळे लग्न करुन परत निघालेलं नवदाम्पत्य रस्त्यावरच अडकून पडलं. हाजीपूरवरुन लग्न उरकून परतल्यानंतर मुजफ्फरपूरला निघालेलं हे नवदाम्पत्य रस्त्यांवरील ट्राफिकमध्ये अडकलं आहे. (The nationwide response to the Bharat Band called by farmers)
आंध्र प्रदेशात डावे रस्त्यांवर
आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं डाव्या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला आहे. त्या भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी डावेही रस्त्यावर उतरले आहेत.
Andhra Pradesh: Left political parties stage a protest in Vijayawada, in support of today's #BharatBandh called by farmer unions, against Central Government's #FarmLaws. pic.twitter.com/PsbrFNxlaL
— ANI (@ANI) December 8, 2020
ओडिशा मध्येही रेल्वे अडवल्या
ओडिशातील भुवनेश्वर रेल्वे स्थानकांवरही रेल्वे अडवून धरल्या जात आहेत. डावे, कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी इथं रेल्वे रुळावर उतरत रेल्वे गाड्या अडवून धरल्याचं चित्र पाहायला मिळालं.
Odisha: Left political parties, trade unions and farmer unions stop trains at Bhubaneswar Railway Station.
Farmer Unions have called #BharatBandh today, over Centre's #FarmLaws. pic.twitter.com/C63X69FSlE
— ANI (@ANI) December 8, 2020
उस्मानिया विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर उद्या होणारी परीक्षा पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर आज रद्द करण्यात आलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं जाईल, असं विद्यापीठाकडून कळवण्यात आलं आहे.
महाराष्ट्र: बुलडाण्यात स्वाभिमानीने रेल्वे अडवली
महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मलकापूर स्थानकावर रेल्वे अडवून धरली. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
Maharashtra: Swabhimani Shetkari Saghtana staged 'Bharat Bandh Rail Roko' protest and briefly stopped a train today in Malkapur of Buldhana dist. They were later removed from the tracks by Police & detained.
Farmer Unions have called #BharatBandh today, over Centre's #FarmLaws pic.twitter.com/syREnd7Iez
— ANI (@ANI) December 8, 2020
Big News
शेतकरी आंदोलन: दिल्लीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व विरोधी पक्षांची बैठक
सविस्तर वाचा-👉 https://t.co/vag8JOlKFE@PawarSpeaks @NCPspeaks #FarmersProtest #FarmLaws #FarmBills #FarmerPolitics— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 8, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’