नवे संसद भवन ही केवळ इमारत नसून 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे- पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संसदेच्या नव्या इमारतीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ही एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे, संसदेची नवीन इमारत नव्या भारताचे प्रतिक बनली आहे. असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या ९ वर्षींची कामगिरीही मांडली.

भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो असं मोदी म्हणाले, नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. भारत हा केवळ सर्वात मोठी लोकशाही असेलला देश नाही तर लोकशाहीची माताही आहे. देशाचे हे नवे संसद हे संपूर्ण जगाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारे मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारा दुवा सिद्ध होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. ही नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचा सूर्योदय पाहणार आहे. आज आपण नवा भारत नवीन मार्ग तयार करत आहे आणि नवीन ध्येये निश्चित करत आहोत असेही मोदीं म्हणाले

पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत, आपल्या देशाचा आणि तेथील लोकांचा विकास ही आपली प्रेरणा आहे. आज या नवीन संसदेच्या उभारणीचा आपल्याला जसा अभिमान वाटतो, तसेच गेल्या 9 वर्षांत देशात 4 कोटी गरीब लोकांसाठी घरे आणि 11 कोटी शौचालये बांधल्याचा विचार करताना मला खूप समाधान मिळते असं मोदींनी म्हंटल.