Wednesday, October 5, 2022

Buy now

राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल; नाना पटोलेंचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2024 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठं अपयश आले आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या दाव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात पुन्हा एकदा उत्साह येईल का हे पाहावे लागेल.

नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत म्हंटल की, २०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल. दरम्यान, दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना नाना पटोले सातत्याने स्वबळाचा नारा देत असतात. आता त्यांच्या ट्विट ने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतच बिघाडी होणार नाही ना हे पाहावे लागेल.

राज्यात काँग्रेसचे 44 आमदार

2014 ला राज्यात सत्ताबदल होऊन भाजपची सत्ता आली. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या लाटेत अनेक नेत्यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपची वाट धरली. परिणाम निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मरगळ आली आणि काँग्रेसचे फक्त 44 आमदार जिंकून आले. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.