पुढचा महापौर शिवसेनेचाच, औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला – संपर्कप्रमुख घोसाळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी होवो अथवा न होवो सर्व वॉर्डीमध्ये आपले उमेदवार असतील. शहराचा नवा महापौर शिवसेनेच्या ताकदीवरच बसवण्यासाठी आतापासून नियोजन सुरु करण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख घोसाळकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना घोसाळकर म्हणाले, की औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या शहराचा महापौर शिवसेनेचाच असला पाहीजे. शिवसेनेच्या ताकदीवरच महापौर निवडून आला पाहिजे. शाखाप्रमुख हा संघटनेचा महत्वाचा घटक आहे. महापालिकेच्या निवडणूकीत आघाडी होईल किंवा होणार ही नाह, मात्र आपली पुर्ण तयारी असली पाहीजे.

सर्वच ११५ वॉर्डामध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने आतापासून नियोजन करा असे आदेश घोसाळकर यांनी दिले. शाखा प्रमुखांकडून घोसाळकर यांनी प्रातिनिधिक स्वरुपात वॉर्डामधील कामांचा आढावा घेतला. शहरप्रमुखांनी देखील मनोगत व्यक्त केले. पूर्वचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघातील वॉर्डीमध्ये विकास कामे झाली नसल्याचे सांगितले. या मतदारसंघात आमदार शिवसेनेचा नाही, खासदार शिवसेनेचा नाही त्यामुळे विकास कामांना निधीच मिळत नाही. शिवसेनेचे मंत्री आमदारांनी निधी द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. औरंगाबाद मध्य व पश्चिम मतदारसंघातील कामांबद्दल मात्र शहरप्रमुखांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Comment