आर्थिक बजेट उपलब्ध नसल्यामुळे पाण्याचे नळ जोडणीची योजना अद्याप अपूर्णच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यातील एकूण 128 गावांमध्ये अद्याप पाण्याची नळ जोडणीची योजना करण्यात आलेली नाही. ही योजना आर्थिक बजेट उपलब्ध नसल्यामुळे खोळंबली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. यावेळी 281 पाणीपुरवठा योजना या कालबाह्य झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 1542 शाळा असून 190 अंगणवाड्या आहे. या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये देखील पाण्याचे कनेक्शन नाही.

राज्य सरकार खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. मात्र औरंगाबाद तहसीलमधील अनेक गावांना शासकीय योजनांची माहिती नव्हती. आणि अजूनही नवीन जलजीवन मिशन अनेक गावात पोहोचलेले नाही.पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अ‍ॅक्शन प्लानला एकूण 430 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. परंतु, हा प्लान अजूनही जाहीर झालेला नाही.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मीना शेळके यांनी या योजनेची माहिती खेड्यांपर्यंत न नेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना चांगलाच चोप दिला आहे. या बैठकीला सरपंच, गट विकास अधिकारी, सर्व ग्रामसेवक आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रत्येक घरात 55 लिटर पाणी मिळावे अशी तयारी करण्यात आली आहे.

Leave a Comment