आयटी कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल ठरवतील शेअर बाजाराची दिशा; तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली । इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सह माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल आणि मॅक्रो इकॉनॉमिक डेटा या आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरवतील. असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. नवीन वर्ष 2022 ची सुरुवात शेअर बाजारांसाठी खूप चांगली झाली आहे. दरम्यान, बाजारातील सहभागी लोक जागतिक तसेच देशांतर्गत कोविड-19 शी संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवतील.

रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्चचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, “इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक आणि माइंडट्री यासारख्या अनेक आयटी दिग्गज कंपन्या या आठवड्यात त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील. याशिवाय एचडीएफसी बँकेचे तिमाही निकालही येणार आहेत. तसेच, बाजारातील सहभागी औद्योगिक उत्पादन (IIP), किरकोळ महागाई (CPI) आणि घाऊक महागाई (WPI) डेटावर लक्ष ठेवतील. एकूणच, जागतिक निर्देशक आणि कोविड-19 शी संबंधित बातम्यांचाही बाजारावर परिणाम होईल.

IT कंपन्यांचे महत्त्वाचे तिमाही निकाल
ते म्हणाले की,”IT कंपन्यांचे तिमाही निकाल बाजाराला दिशा देईल. बड्या IT कंपन्यांचे निकाल उत्साहवर्धक असतील अशी अपेक्षा बाजारातील सहभागींना आहे.” मिश्रा म्हणाले की,” कोविडचे नवीन स्वरूप असलेल्या ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांकडे बाजाराने आतापर्यंत “दुर्लक्ष” केले आहे, मात्र अनेक राज्यांनी कडक निर्बंध घातल्यामुळे बाजारावर परिणाम होऊ शकतो.”

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट लि. IT चे रिसर्च प्रमुख संतोष मीना म्हणाले, “हा आठवडा IT कंपन्या, IIP, CPI आणि WPI डेटाच्या निकालांमुळे बाजारासाठी खूप व्यस्त असणार आहे. IIP आणि CPI आकडे 12 जानेवारीला आणि WPI चे आकडे 14 जानेवारीला येतील.”

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती ही चिंतेची बाब आहे

जागतिक आघाडीबाबत बोलताना कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. याशिवाय चीनची महागाई आणि अमेरिकेतील किरकोळ विक्रीची आकडेवारीही बाजाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे.