प्रवाशांसह स्कॉर्पिओ गाडी पडली पुराच्या पाण्यात ; प्रवासी सुखरूप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र परभणी | परभणीत मागील दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसानंतर नदी नाल्यांना पूर आल्याने पुर परिस्थिती निर्माण झाले आहे .मंगळवारी संध्याकाळी उशीरा अशाच एका पूर आलेल्या पुलावरून रस्ता पार करणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाला पाण्याचा अंदाज न आलेले स्कॉर्पिओ गाडी प्रवाशांसह नदीत पडल्याची घटना घडलीयं . सुदैवाने या घटनेत ग्रामस्थांनी मदतीला येत प्रवाशांना गाडीबाहेर सुखरुप बाहेर काढले आहे .

जिल्हातील पाथरी तालुक्यात मंगळवारी पहाटे पडलेल्या पावसाने 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती .यामुळे तालुक्‍यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला होता .तालुक्यातील पिंपळगाव गावाजवळील नदीवरील पुलावरूनपुराचे पाणी वाहत असल्याने या ठिकाणावरून जाणारी वाहतूक दिवसभर ठप्प होती . संध्याकाळी या मार्गे स्कॉर्पिओ गाडी ज्यामध्ये सहा प्रवासी प्रवास करत होते , पुलावरील पाण्यातून पुढे जाण्याचा प्रयत्नात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज जीप चालकाला न आल्याने स्कॉर्पिओ नदीपात्रात पडली .

घटना घडली या वेळी शेजारी गावातील काही ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते त्यांनी गावातील इतर ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले , माहिती कळताच चाटे पिंपळगाव येथील उपसरपंच गणेश काळे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गाडीतील सहा प्रवासी व स्कॉर्पिओ गाडीला रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान पाण्यातून बाहेर काढले आहे .

दरम्यान या नदीवर विनाकठडे व कालबाहय झालेल्या पुलामुळे आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत ग्रामस्थ सदरील पुलाला नव्याने तयार करा त्याची उंची वाढवावी यासाठी मागील अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने वारंवार दुर्घटना याठिकाणी घडत आहेत .

Leave a Comment