हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या जगामध्ये असे काही देश आहेत जिथे वास्तविकमध्ये आश्चर्यकारक घटना घडतात. या घटनांमागे खगोलशास्त्रीय कारण असले तरी ते सर्वांनाच थक्क करून सोडणारे असते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे, पृथ्वीवर असे काही देश आहेत जिथे अनेक महिने झाले तरी सूर्य मावळत नाही. म्हणजेच अशा देशांमध्ये रात्रच होत नाही. हे देश नेमके कोणते आहे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घेऊयात.
नॉर्वे – युरोपाच्या उत्तरेस वसलेला नॉर्वे सूर्य न मावळणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या देशांमध्ये सूर्योदयाचा कालावधी अधिक असून सूर्यास्ताचा कालावधी सर्वात कमी आहे. थोडक्यात या देशांमध्ये तब्बल 76 दिवस सूर्य मावळतच नाही. या देशांमध्ये वर्षात मे आणि जून या काळामध्ये रात्र होत असते.
नुनावुत – नुनावुत देश उत्तर कॅनडा आर्क्टिक सर्कलपासून दोन अंश वरती स्थित आहे. या देशांमध्ये वर्षाचे 60 दिवस सूर्य मावळत नाही. परंतु थंडीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी तब्बल 30 दिवस अंधारात असतो. जगातील सर्वात जास्त थंडी पडणाऱ्या ठिकाणांमध्ये नुनावुतचा समावेश आहे.
स्वीडन – युरोप खंडामध्ये वसलेला आहे तो म्हणजे स्वीडन देश. या देशांमध्ये 6 महिने सकाळच असते. येथे सूर्य 12.00 च्या आसपास मावळतो. तसेच पहाटे 4.30 वाजता पुन्हा सूर्योदय होत असतो.
आईसलँड – आईसलँड हे उत्तर युरोपातील अटलांटिक महासागरात वसलेल्या देश आहे. या देशांमध्ये सूर्य लवकर मावळतच नाही. म्हणजेच या देशांमध्ये तब्बल सत्तर दिवस सुर्यास्त होत नाही. या देशात हिवाळा जास्त असतो मात्र उन्हाळा खूपच कमी राहतो.