रस्ता दाखविणे पडले महागात; तिघांनी बेदम मारहाण करीत तरुणाला लुटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | रिक्षात दळण घेऊन घरी जाणाऱ्या रिक्षचालक तरुणाला तिघांनी रस्त्यावर अडवत बेदम मारहाण करून दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील जुनी शिवराई रोडवर घडली.या घटने मुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आप्पासाहेब सुरेश साबळे वय-27 (रा.शिवराई, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आप्पासाहेब हा त्याच्या(एम.एच.20 इ.जि.8801) या लोडिंग मधून साबळे वस्ती येथून दळण घेऊन घरी शिवराई कडे जात होता.दरम्यान जुनी शिवराई रस्त्यावरील  ईस्ट-वेस्ट कंपनी समोर एक व्यक्ती त्यांच्या रिक्षा समोर आला व त्याने रिक्षा थांबत हा रस्ता कुठे जातो असे विचारणा केली.अप्पासाहेबांनी त्यांना माहिती दिली. मात्र त्याचवेळी त्यातील एकाने गाडीची चावी काढून घेत त्यांच्या जवळील वाहनांच्या शॉकअप ने डोक्यावर मारत जखमी केले.

रिक्षाच्या बाहेर काढून तिघांनी बेदम मारहाण केली.व खिशातील मोबाईल व सतराशे रुपये रोख घेऊन दुचाकीवरून पसार झाले. जखमी अवस्थेत अपप्पासाहेब अनेक तास तेथेच पडून होता.ओळखीच्या एका व्यक्तीने ही माहिती घरच्यांना दिल्या नंतर  अप्पासाहेबला रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपी विरोधात विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास  उपनिरीक्षक उंबरे करीत आहेत.

Leave a Comment