दुचाकी समोर आल्याने ट्रक पलटी होऊन झाला चुराडा; सुदैवाने जीवितहानी नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | जालण्याहून लोखंडी सळई घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी झाला या अपघातात ट्रकचा चुराडा झाला. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात औरंगाबाद-अहेमदनगर महामार्गावरील छावणी भागात घडला. (एम.एच.12 डी. जि.7158) हे मालवाहू ट्रक जालना येथून सळई घेऊन पुण्याकडे जात असताना छावणी भागात अचानक एक दुचाकीस्वार भरधाव ट्रकच्या समोर आला.

त्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात ट्रक्चलकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला.प्रसंगवधान राखून चालकाने उडी घेतली. या अपघातामध्ये ट्रकचा चुराडा झाला मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.छावणी पोलिसांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत.वाहतूक सुरळीत केली.

Leave a Comment