मोठ्या बहिणीचा पिच्छा करणाऱ्या दोन रोडरोमिओंना लहान बहिणीने भररस्त्यात बदडले

औरंगाबाद : मोठ्या बहिणीचा पिच्छा करत तिची छेड काढणाऱ्या दोन टवाळखोरांना छोट्या बहिणीने भररस्त्यात बदडल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सूतगिरणी चौक या ठिकाणी उघडकीस आली आहे. हा प्रकार पाहणार्‍या नागरिकांनी सदर तरुणीचे धाडस पाहून कौतुक केले.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी संगीताची मोठी बहिण स्वाती (नावे बसलेली आहेत) लहान भावा सोबत औरंगपुरा परिसरात गेली होती. तेथून भावाचा गारखेडा परिसरात कोचिंग क्लास असल्याने तिला तिकडे सोडण्यासाठी ती औरंगपुरा ते गारखेडा खेड्याकडे निघाली तेव्हा औरंगपूऱ्यातून तिच्या मागे दोन टवाळखोरांनी तिचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार स्वातीच्या लक्षात आल्यानंतर थोड्यावेळाने थांबतील म्हणून तिने दुर्लक्ष केले. मात्र टवाळखोरांना तिचा पिच्छा करत छेडछाड सुरू केली. थोड्या वेळाने स्वातीने संगीताला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा संगीताने पुढे जाण्यास सांगून ती सूतगिरणी चौकात पोहोचली तरी ते दोन तरुण तिचा पिच्छा करत असताना संगीताने पाहिले आणि तिचा राग अनावर झाला तेव्हा तिने त्या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, हे सर्व दृश्य पाहून एक टवाळखोर पळून गेला. तर दुसऱ्याने माफी मागून तेथून पोबारा केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी देखील जमा झाली होती. संगीताची हिम्मत पाहून लोकांनी तिच्या धाडसाला दाद दिली.