लहान भावाला वाचवताना मोठ्या भावाचा दुर्दैवी मृत्यू

परभणी : जिंतूर तालुक्यातील बेलखेड येथील तलावात पोहत असताना लहान भाऊ बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय मोठ्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 31 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

निवळी येथील 11 वी मध्ये शिक्षण घेणारा सोनाजी एकनाथ सूर्यवंशी (18) लहान भाऊ गजानन (१६) मित्र सिद्धार्थ सखाराम घुगे यांच्यासोबत पोहण्याकरता गेला होता. पोहत असताना गजानन बुडत असल्याचे पाहून त्याचा मोठा भाऊ सोनाजी याने पाण्यात उडी घेतली.

मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो स्वतः पाण्यात बुडाला. सोबतच्या सिद्धार्थ घुगे या मित्राने लहान भाऊ गजाननचा जीव वाचविला परंतु सोनाजी याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.

You might also like