स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट अवतरणार रुपेरी पडद्यावर; महेश वामन मांजरेकर करणार दिग्दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रखर व तेजोमय राष्ट्रभक्त आणि तडफदार व परखड असे व्यक्तिमत्व असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता महेश वामन मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शनाबरोबरच महेश मांजरेकर ऋषि विरमणी यांच्यासह या चित्रपटाच्या कथेचे लेखनदेखील करणार आहेत.

https://www.instagram.com/p/CPapnAfMKPa/?utm_source=ig_web_copy_link

 

चित्रपट निर्माते संदीप सिंह आणि अमित वाधवानी हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी हितेश मोदक आणि श्रेयस पुराणिक यांच्या खांद्यावर आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, अंदमानसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी केले जाणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सावरकर प्रेमी अत्यंत आनंदी झाले आहेत. सोशल मिडियावर याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPZz9rLJ4tY/?utm_source=ig_web_copy_link

 

याआधी संदीप सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची निर्मिती केली होती. “सावरकरांचे जीवन हे खूप संघर्षमय आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच मला प्रोत्साहित करते. या देशाच्या तरुणांना सावरकरांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो” अशी प्रतिक्रिया निर्माते अमित वाधवानी यांनी दिली.

https://www.instagram.com/p/CPPg4V8pRSy/?utm_source=ig_web_copy_link

 

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता असणारे लोकप्रिय महेश मांजरेकर यांनी आपल्या विविधरंगी गुणांनी प्रेक्षकांचा मोठा वर्ग आपल्या बाजूने वळविला आहे. एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर नेहमीच सुपर से उपर राहिले आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत महेश यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

https://www.instagram.com/p/CDJKYlgsAJu/?utm_source=ig_web_copy_link

 

या चित्रपटाविषयी बोलताना, महेश मांजरेकर यांनी सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शन करणे नक्कीच एक मोठं आव्हान असेल आणि मी ते स्वीकारण्यास तयार आहे. तसेच “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवन संघर्ष नेहमीच मला प्रभावित करत आला आहे. माझे असे स्पष्ट मत आहे कि, सावरकरांना देशाच्या इतिहासात जे स्थान मिळायला हवे होत ते मिळाले नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून सावरकरांनी या देशासाठी दिलेले योगदान मांडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे”.

Leave a Comment