दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
माण तालुक्यातील काळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता, हरित शाळा, सुंदर शाळा, उत्कृष्ट परसबाग, शिक्षकांनी केलेले उत्कृष्ट उल्लेखनीय काम, सुंदर देखणी इमारत, तसेच 10 फूट उंचीची संरक्षक भिंत याबाबत सर्व शिक्षक उत्कृष्ट काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कार्य उत्कृष्ट घडवत आहेत. काळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गोंदवले गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. भारती पोळ यांनी व्यक्त केले.
काळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून स्मार्ट टीव्हीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यावेळी बबनदादा विरकर, केंद्रप्रमुख नारायण आवळे, सरपंच सौ. अरुणा महानवर, ग्रामसेवक श्री. गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास काळे, उपाध्यक्ष अक्काताई वाघमोडे, पांडुरंग महानवर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळेतील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका स्मिता ओंबासे व सौ. डोईफोडे तसेच आर्या राजगे हिने ‘मी सावित्री बोलतेय’ ही एकांकिका सादर केल्याबद्दल तिघींचा त्यांनी गौरव केला. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत दोरगे यांनी सूत्रसंचालन केले. आभार दिलीप खरात यांनी मानले.