भारताला तिसऱ्या लाटेचा धोका?, ऑमिक्रोनबाबत WHOच्या अधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वांपुढे एक नवे संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत 7 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे 37 रुग्ण आढळले आहेत. तर ओमिक्रोनच्या हा वेरियंट आतापर्यंत जगातील 59 देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान एकीकडे भारतात तिसरी लाट येण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी म्हंटले आहे की, नवीन वेरियंटमुळे परिस्थिती गंभीर होईल किंवा चिंताजनक होईल असे नाही. पण नक्कीच परिस्थिती अनिश्चित असेल. नवीन वेरियंट आल्याने आणि जगातील अनेक देशांमध्ये तो पसरत असल्याने जोखीम वाढली आहे. दक्षिण आशियात आपण हातातील शस्त्र खाली ठेवायला नको. आपल्याला बारीक लक्ष ठेवावे लागेल. देखरेखीची व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपययोजना बळकट करणे ठेवले पाहिजे, असे डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले.

जगभरात देशात बसलेल्या या नव्या ओमिक्रोनच्या व्हेरियंटबाबत माहिती देताना डॉ. सिंग यांनी म्हंटले की, भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, राजस्थान, चंदीगड आणि आंध्र प्रदेश या 7 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला आहे. ओमिक्रॉनची संसर्ग क्षमता, गंभीरता, पुन्हा संसर्ग होण्याचा धोका यासह इतर कारणांचा अभ्यास करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी माहिती ही संसर्ग पुन्हा होण्याचा धोका दर्शवत आहे. पण आणखी ठोस निष्कर्षासाठी अधिक माहितीची गरज असल्याचे डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले.

You might also like