Monday, February 6, 2023

जगातील 15 सर्वात मोठे जागतिक फंड मॅनेजर भारतात करणार मोठी गुंतवणूक, पंतप्रधानांची लवकरच घेणार भेट

- Advertisement -

नवी दिल्ली। देशातील गुंतवणूक वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी लवकरच ग्लोबल फंड हाऊसच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदी भारताच्या पायाभूत प्रकल्पांमधील गुंतवणूकीवर चर्चा करतील. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी याबाबत माहिती दिली आहे. या हालचालीचे उद्दीष्ट अर्थव्यवस्थेला चालना आणि दीर्घकालीन भांडवल आकर्षित करणे हे आहे. या व्यतिरिक्त बजाज म्हणाले की, बाँड मार्केट मध्ये फ्लो वाढविण्यासाठी सरकार रिझर्व्हसोबत लक्षपूर्वक काम करीत आहे जेणेकरुन जागतिक बाँड निर्देशांकात भारताचा समावेश होऊ शकेल.

चांगल्या इन्फ्रा एसेटमध्ये गुंतवणूक करेल
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बजाज सीआयआयने आयोजित केलेल्या व्हर्चुअल कॉन्फरन्समध्ये म्हणाले की, जगभरातील फंड हाऊसेस आमच्या संपर्कात आहेत ज्यांना येथे चांगल्या इन्फ्रा एसेटमध्ये गुंतवणूक करायची आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्याशी भेट घेतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला कसे पुढे आणता येईल हे सुचवतील.

- Advertisement -

सरकारी क्षेत्रातून किती पैसा येईल ?
या व्यतिरिक्त बजाज म्हणाले, “राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनमध्ये सरकारी क्षेत्रातून किती पैसे येऊ शकतील आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीतून किती पैशांची आवश्यकता आहे यावर आम्ही काम करीत आहोत.”

111 लाख कोटींची आवश्यकता असेल
देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सरकारी टास्क फोर्सला येत्या पाच वर्षांत एकूण 111 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल. या टास्क फोर्सने यासाठी 7,000 प्रोजेक्टसची निवड केलेली आहे.

सरकारने ‘या’ देशांच्या पेन्शन फंडांशी संपर्क साधला
याशिवाय बजाज म्हणाले की अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या पेन्शन फंडांनी सरकारशी संपर्क साधला आहे. पायाभूत सुविधांसाठी भांडवल मिळावे यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार देशांतर्गत विमा आणि पेन्शन फंड नियामकांशीही जवळून काम करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.