मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे “पेट्रोल – डिझेलच्या” किंमती वाढल्या ; काँग्रेस नेत्यांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे कुठलेच आर्थिक धोरणं नाहीये म्हणून देशात महागाई प्रचंड वाढली आहे,तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती या मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.

मोदी सरकार हे पेट्रोल वर ३२.९० रुपये अधिभार आकारतय तर डिझेलवर ३१.८० रुपये अधिभार आकारतय म्हणून आपसूकच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत.हाच अधिभाराचा दर ज्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार होते.त्यावेळी अनुक्रमे ९.२० आणि ३.४६ एवढा कमी होतं म्हणून आम्ही पेट्रोल – डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेऊ शकतं होतो. असंही गेहलोत पुढे म्हणाले आहेत.

गेल्या ११ दिवसांपासून सतत किंमती वाढत असल्याने जनता बेजार झाली आहे.मी माझ्या पदाचा वापर करून राज्य सरकार लावत असलेला कर कमी करायचा प्रयत्न करतोय पण केंद्र सरकार मात्र या बाबत अजिबात गंभीर नसून त्यांना याची काहीच पडलेली नाही. असही गेहलोत म्हणाले आहेत.तसेच काही लोकं जाणून – बुजून असा खोटा प्रचार करताय की राजस्थानात पेट्रोल – डिझेलच्या सर्वाधिक किंमती आहेत.तर असा आरोप करणाऱ्यांनी आधी मध्यप्रदेश,गुजरात आणि हरयाणात पेट्रोल – डिझेलचे भाव बघावेत मग माझ्या राज्याविषयी बोलावे, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment