प्रियसीने भेटायला नकार दिल्याने तरुणाची अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | लग्न झालेल्या प्रेयसीने भेटायला नकार दिल्यामुळे एका प्रियकराने अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना इटखेडा येथे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तुषार संजय गायकवाड (32,रा.ठाणे )असे मृताचे नाव आहे.

लग्न झालेल्या प्रेयसीने भेटायला आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडायला नकार दिल्याने त्याने आरडाओरड करत अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तुषार हा मुंबई महापालिकेत नोकरी करत होता. ठाणे शहरातील तरूणी सोबत त्याचे प्रेम संबंध होते. प्रेयसीच्या घरातील मंडळीना त्यांचे प्रेम मान्य नसल्यामुळे त्यांनी तिचे लग्न औरंगाबादेतील एका तरूणासेाबत लावून दिले. लग्नानंतर तरूणीला दोन अपत्य झाली. ती पतीसोबत ईटखेडा परिसरात राहते. परंतु तुषारचे तिच्यावर प्रेम असल्याने त्याने लग्न केले नाही. तो तिला भेटण्यासाठी औरंगाबादेत येत होता. बुधवारी तो औरंगाबादला आला आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले.

तेव्हा ‘तू माझ्यासोबत चल असे तो म्हणाला. मात्र पती घरी असल्याने तिने त्याला भेटण्यास नकार दिला. त्याचबरोबर येथून निघून जा, असे ती सतत सांगत होती. याचा राग आल्याने तो तिच्या अपार्टमेंटमध्ये गेला. आणि त्याने आरडाओरड करून तिला पुन्हा घराबाहेर येण्यास सांगितले. यानंतरही तिने नकार देताच तुषार अपार्टमेंटच्या छतावर गेला आणि त्याने तेथून थेट खाली उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्या बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती रहिवाश्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविली. सातारा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तुषारला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तुषारला तपासून रात्री 10.50 वाजता मृत घोषित केले. पोलीस हवालदार युवराज हिवराळे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment