व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी गेला युवक, मारून मारून बायकोने केलं जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराची मधील एका युवकाने पहिले दोन लग्न केले आणि पुन्हा तिसऱ्या लग्नाची तयारी करताना लग्नमंडपात त्याच्या पहिल्या बायकोने त्याला लग्नाच्या वऱ्हाडी मंडळाच्या समोरच तिने त्याला खूप मारले कि तो तिसऱ्या लग्नासाठी उभा पण राहू शकत नाही. त्या पहिल्या बायकोच्या विरोधात जाऊन त्याने पोलीस स्टेशन मध्ये तिची तक्रार दाखल केली. जबरदस्तीने घुसून मारले असे त्याने तक्रारीत म्हंटले आहे. त्यानंतर मात्र त्याच्या परस्पर हा मी मामला सोडवला आहे . असे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी सांगितले कि, या नवरदेवाला त्याच्या पहिल्या बायकोने जबरदस्त मारले आहे. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या मतानुसार जिने मारले ती त्याची पहिली बायको होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना सोडचोट्टी दिली आहे. तिचा आणि त्याचा आता कोणताही संबंध नाही. तरीही तिने त्याला मारले हे चुकीचे आहे. तो तिच्यावर केस टाकून कठोर शिक्षा देणार आहे. तसेच तो त्याच्या वकिलाशी सुद्धा बोलणार आहे. वकील जे म्हणतील त्यापद्धतीने तो तिच्यावर कारवाई करणार आहे.

परंतु त्याच्या पत्नीनुसार त्याने २०१८ मध्ये पहिले लग्न केले होते. त्याच पद्धतीने तो तिसरे सुद्धा लग्न करत होता. तेव्हा त्याला रंगेहाथ पकडले. मुस्लिम समाजात पहिले लग्न केले तर दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिल्या बायकोची सामंती असावी लागते. त्यानुसार त्याने कोणतीच समंती काढली नव्हती. असे त्याच्या पहिल्या बायकोचे मत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.