मनपा रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहासमोर आज सोमवारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवला असून सुरुवातीपासूनच मनसेने याला विरोध केला आहे. मात्र महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने पुन्हा एकदा निदर्शनं करण्यात आली.

शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. गेल्या काही वर्षांपासून नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी हे नाट्यगृह बंद आहे. मागील वर्षात याचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. एवढा खर्च झाल्यानंतर आता मनसेने हे नाट्यगृह खासगी कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. खासगीकरण करायचंच होतं तर जनतेचा 10 कोटी रुपयांचा निधी त्यासाठी का वापरला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे.

आंदोलनानंतर भूमिका मांडताना मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले, संत एकनाथ रंगमंदिराचं खासगीरकरण करण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वी झाला होता. आम्ही यास विरोध दर्शवला होता. तरीही महापालिका त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. 10 कोटी खऱ्च करूनही खासगीकरण फक्त कंत्राटदारांच्या चिरीमिरी करण्यासाठी घेण्यात आला असल्याचा आरोप सुमित खांबेकर यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘एकवनाथ रंगमंदिराचं खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तम रितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे. तरीही महापालिका जर रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी. अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून खासगीकरणाला आमचा विरोधच राहणार असल्याचंही यावेळी खांबेकर म्हणाले.

Leave a Comment