गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्यात आम्ही जेवढ्या जागा लढवू त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणू, त्यामुळे गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची घोषणा केली.

गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आया राम गया राम ही कल्पना आता हरियाणा नंतर गोव्यात दिसत आहे. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाचा आणि गोव्यातील राजकीय पक्षांचा लोकांना कंटाळा आला असे राऊत यांनी म्हंटल.

शिवसेना कुठून किती जागावर लढणार आणि राष्ट्रवादी गोव्यात कुठून किती जागावर लढणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. याबाबतची यादी उद्या जाहीर करण्यात येईल असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादीची युती नेमकी किती जागा लढवणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.