महाराष्ट्रातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळे; एकवेळ नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या महाराष्ट्रात पर्यटकांकांसाठीही अनेक पर्यटक स्थळे आहेत जिथे जाऊन आपण खूप सारा एन्जॉय करू शकतो. आज आम्ही आपणास अशी 7 ठिकाणे सांगणार आहोत जी पर्यटनासाठी योग्य आहेत.

मुंबई

देशातील प्रमुख 4 शहरांमध्ये समावेश असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, गेट वे ऑफ इंडिया , आणि मरीनड्राइव्ह परिसर अक्षरशः डोळ्याला भुरळ घालेल.

माथेरान-
माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुणेकरांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे.

अलिबाग
अलिबाग हे सुंदर समुद्रकिनारे आणि प्राचीन किल्ल्यांसाठी ओळखले जाते. अलिबागच्या विविध पर्यटन स्थळांपैकी अलिबाग बीच, किहीम बीच, अक्षय बीच, मांडवा बीच, काशीद बीच, वरसोली बीच, नागाव बीच आणि मुरुड बीच हे अलिबागमधील लोकप्रिय समुद्रकिनारे आहेत. पर्यटक खांदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, विक्रम विनायक मंदिर किंवा बिर्ला मंदिर, चुंबकीय वेधशाळा आणि कोरलाई किल्ल्याला भेट देऊ शकतात

कास पठार – सातारा
सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. कास पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे.

दौलताबाद
हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात आहे. याला देवगिरी असेही म्हणतात. दौलताबादमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आवर्जून पहाव्यात. या इमारतींमध्ये जामा मशीद, चांद मिनार, चिनी महाल आणि दौलताबाद किल्ला यांचा समावेश आहे.

लोणार सरोवर-
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हे सरोवर तब्बल ५२ हजार वर्ष जुनं आहे.  हे सरोवर राज्यातील सात आश्चर्यांपैकी मानले जाते. सरोवराचा व्यास वरच्या बाजूस १.२ कि.मी. आणि खालच्या बाजूस सुमारे १३७ मीटर एवढा आहे. तेपृथ्वीतलावरील अग्नीजन्य खडकातील एकमेव अशनीपात विवर असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे अद्वितीय, अद‍्भुत आणि सर्वांसाठी रहस्यमय असणारा, निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे.

सिंधुदुर्ग किल्ला-
सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सागरी किल्ला होता. सिंधुदुर्ग किल्ला हे मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि साधनसंपत्तीचे मूर्त उदाहरण आहे. हा शक्तिशाली किल्ला केवळ ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय आकर्षण नाही तर आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.  सिंधुदुर्ग किल्ल्याच्या  बांधकामला आसपासच्या खडकांचे नैसर्गिक संरक्षण त्यांच्या फायद्यासाठी वापर होतो. त्याच्या भक्कम भिंती आणि स्पष्ट प्रवेशद्वारांसह, हा किल्ला इतिहासाचा एक आकर्षक भाग आहे ज्यामुळे तो एक आवडता पर्यटन स्थळ बनतो.