नाशिकमध्ये मोठी खळबळ! चोरट्याने भरदिवसा साडेतीन लाख रूपये केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनमाड : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक चोरीची (thief) घटना उघडकीस आली आहे. हि चोरी (thief) भरदिवसा झाल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि चोरीची (thief) घटना लासलगावमध्ये घडली आहे. हि संपूर्ण चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसाढवळ्या कारमधून रक्कम लंपास करण्याच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
एका व्यापाऱ्याने बँकेतून काढलेले साडेतीन लाख रुपये पिशवीत ठेवले होते. ही पिशवी त्याने कारमध्येच ठेवली. यानंतर तो व्यापारी कार रस्त्याच्या कडेला उभी करून मार्केटमध्ये गेला. यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून असणाऱ्या चोराने (thief) हि संधी साधून कारची काच तोडली. त्यानंतर त्याने कारमधील साडेतीन लाख रुपयांची रोखड घेतली आणि त्या ठिकाणाहून पळ काढला.

हा चोर चोरी (thief) करताना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. हा चोर आजूबाजूच्या लोकांना संशय येऊ नये यासाठी अगदी सहज या कारजवळ जाऊन उभा राहतो आणि अवघ्या 15 सेकंदाच्या आत तो कारची काच तोडून आतमधील पैसे लंपास करतो. पोलिसांनी या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय