पुणे- बंगळूर महामार्गावर चोरट्यांनी जिलेटीनने बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM उडविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बंगलोर महामार्गावरील नागठाणे येथे रस्त्याकडेला असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट करून उडवून दिले आहे. या स्फोटानंतर चोरट्यांनी लाखों रूपयांची रक्कम चोरण्यात चोरटे यशस्वी झाल्याची अद्याप माहिती समोर येत असून अद्याप अधिकृत किती रक्कम चोरीस गेली आहे, हे समोर आलेले नाही. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी बोरगाव पोलीस दाखल झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत नागठाणे येथे महामार्गावर बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आहे. महामार्गावर नेहमीच रहदारी असते. तर रात्रीच्या सुमारासही वाहनांची वर्दळ असते. तरीसुध्दा मध्यरात्री केलेली चोरी ही धाडसी असून त्यात चोरटे यशस्वी झाले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी जिलेटीनच्या कांड्यानी उडवून देत फोडले आहे. एटीएम उडविल्यानंतर त्यातील रक्कम चोरण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. केवळ दीड- दोन किलोमीटर पोलिस स्टेशन असतानाही चोरट्यांनी धाडसी चोरी केलेली आहे. ATM मधील किती रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत, यांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. परंतु लाखोंची नेली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरट्यांनी काळा स्प्रे मारून ही लूट केली आहे.

कराडमधील अयशस्वी तर नागठाण्यात यशस्वी ः- मागील 2 महिन्यांपूर्वी कराड येथील बँक ऑफ इंडियाचे गोवारे शाखेचे एटीएम जिलेटीन कांड्यानी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मात्र नागठाणे येथील एटीएम फोडण्यात चोरट्यांना यश आले आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस पथके रवाना झाली आहेत. कराड आणि नागठाण्यात एकाच प्रकारे एटीएम फोडण्याची पध्दत वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही घटनांच्यात काही साम्य आहे, का हे पोलिस तपासणार आहेत.