Saturday, June 3, 2023

चोराने मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम केली लंपास

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा तालुक्यातील परसोडी गावामध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. परसोडी गावामध्ये मानव मंदिर आहे. या मंदिरात या चोरट्याने डल्ला मारला आहे. परमात्मा एक सेवक यांनी परसोडी गावामध्ये एक मानव मंदिर तयार केले आहे. या मानव मंदिरामध्ये येणारे भाविक त्या दानपेटीमध्ये पैसे टाकत होते.

हि दानपेटी गेल्या वर्षभरापासून उघडली नव्हती. यामुळे या चोरट्याने डाव साधून रात्रीच्या अंधारामध्ये मंदिराचा गेट तोडून मंदिरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेटी लंपास केली.

ही सगळी घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी चोरट्यांचा शोध घेत आहेत.