पालिकेच्या बजेटवर चोर नगराध्यक्षांना बोलण्याचा अधिकार नाही : स्मिता हुलवान

कराड नगरपालिकेत जनशक्ती आघाडीच्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांवर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

नगरपालिकेच्या बजेटवरून नगराध्यक्षांना म्हणतात की जनरल फंडमध्ये एकही पैसा नाही. या चोर नगराध्यक्षांना बजेटवर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गेल्या वर्षी कोव्हिडच्या काळात मागच्या सभेत सर्व नगरसेवक, सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष आमचे मानधन फंडात जमा करतो. खरे तर यावेळी आमच्या जनशक्तीकडून जमा करणार होतो, मात्र लोकशाही आघाडी आणि भाजप व नगराध्यक्षा यांनी माझे मानधन जमा करण्याचा निर्णय एकमताने केला होता. अशावेळी नगराध्यक्षांनी चोरून मानधन घेतले, असा आरोप महिला बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी नगराध्यक्षा रोहीणी शिंदे यांच्यावर केला आहे.

कराड नगरपालिकेत जनशक्ती आघाडीच्या आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी गटनेते राजेंद्रसिंह यादव, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नगरसेविका प्रियांका यादव, अोकार मुळे, राहूल खराटे, निशान ढेकळे आदी उपस्थित होते. स्मिता हुलवान म्हणाल्या, कोव्हिडसाठी मानधन जमा करण्यासाठी तुम्हांला कोणी जबरदस्ती केली नव्हती. तेव्हा कशाला मोठेपणा दाखवला आणि मानधन काढून घेतले. मग मोठेपणा कशाला दाखवला, त्यामुळे त्यांचा खोटारडेपणा दिसून येतो.

फ्लेक्सच्या ठेकेदाराचे गाॅडफादर कोण तेही उचापतींना विचारा : स्मिता हुलवान

नगराध्यक्षांच्या उचापतीवर फ्लेक्स बोर्डवरून केस झाली. ते बरोबरच होते कारण पालिकेत त्याबाबत ठराव केला आहे. ट्रफिकला अडथळा, शहराचे विद्रुपणीकरण होत होते ते बंद झाले. कृष्णा नाक्यावरील फ्लेक्स बोर्डना आम्ही मान्यता देत नव्हतो. तेव्हा त्या दोन फ्लेक्सना मंजूरी दिली तरच मी सही करणार अशी भूमिका नगराध्यक्षांनी घेतली होती. तेव्हा तुमचा यामध्ये स्वार्थ दिसून होता. फ्लेक्सच्या ठेकेदाराचे गाॅडफादर कोण आहेत ते उचापतींना जावून विचारा, असा सल्लाही स्मिता हुलवान यांनी नगराध्याक्षांना दिला.

कारभार कोण चालवते तुम्ही की उचापती : स्मिता हुलवान

आजच्या ठेकेदारांच्या मिटींग कोण घेते, कोण सेंटलमेंट करते त्यांचा गाॅडफादर कोण आहे. तुम्हांला सह्या करण्यासाठी मध्यस्थी का लागतात. मात्र बजेटमधून चोरी कशी करायची हे तुम्हांला कळते. एखाद्या काॅन्ट्रक्टरचे बिल काढताना टक्केवारी कशी काढायची ते कळते. स्वतः ला लोकनियुक्त म्हणतात, त्यांना विचारा कारभार कोण चालवते तुम्ही की तुमचे उचापती, असा सवाल सभापती स्मिता हुलवान यांनी केला.

You might also like