Wednesday, February 8, 2023

तेरा वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार, नंतर लग्न लावले दुसऱ्याशी

- Advertisement -

औरंगाबाद | तेरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन 21 वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या असलेल्या एका महिलेने जालन्यात नेऊन एका बावीस वर्षीय तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. त्यानेही अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या आईने चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पिंक पथकाने 12 तासात दोन्ही आरोपींना पकडले आता अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या महिलेसह इतरांचा शोध सुरू आहे.

राहुल राजू राठोड, वय 21 (रा. देवळाई तांडा) आणि ज्ञानेश्वर दिगंबर, वय 22 (रा. वरफळ ता, परतुर जि. जालना ) अशी आरोपींची नावे आहेत. राठोडने पिडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर निर्मळा हिवाळे नावाच्या एका महिलेने तिला जालन्याला नेऊन तिबुळेशी लग्न लावून दिले. असा जवाब पिडीतेने चिकलठाणा पोलिसांना दिला आहे.

- Advertisement -

आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस के कुलकर्णी यांनी गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पिंक पथकाच्या उपनिरीक्षक अश्विनीकुमार यांनी 12 तासात दोन्ही आरोपींना अटक केली ही कारवाई हवालदार बादल सिंग पवार यांच्या पथकाने केली आहे.