शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे : राजू शेट्टी यांची राज्यसरकारवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘ शेतकऱ्यांची वीज तोडणी व उसाच्या थकीत बिलाबाबत आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. राज्यातील सव्वा कोटी वीज ग्राहकांचे तीन हजार कोटींचे बिल माफ करणे शासनाला अशक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे राहिले आहे., अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यसरकारवर केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत असलेले सचिन पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ करण्यासाठी राजू शेट्टी पंढरपूर येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. संघटनेचे रविकांत तुपकर, तानाजी बागल, रणजित बागल, विजय रणदिवे उपस्थित होते. आजची जनता हि गेल्या वर्षी कोरोना उपाययोजनांसाठी राज्याचे संपूर्ण बजेट खर्च केले त्याचा हिशोब मागत आहे. विकासकामांना कात्री लावून केलेला हा खर्च तुमच्या भ्रष्टाचारासाठी केलेला नाही, अशा शब्दात शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कोरोनाकाळातील भ्रष्ट कारभाराचा चांगलाच समाचार घेतला.

शेट्टी म्हणाले, ‘ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये बुडवले. अशा लोकांकडे निवडणुका लढवण्यासाठी पैसा आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार आहे. परंतु त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही. अशी टिका भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांवर शेट्टी यांनी केली. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आली आहे. त्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेने न्याय दिला आहे. पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील प्रमुख दोन उमेदवार साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. साखर आयुक्तांवर दबाव आणून आम्ही त्या दोघांवर महसुली थकबाकीची आरआरसी दाखल करायला भाग पाडले आहे. मात्र आजही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये पैसे बुडवले आहेत. याचा राग व्यक्त करायला शेतकऱ्यांना संधी द्यायच्या उद्देशाने उमेदवार उभा केला आहे.

You might also like