हा तर लोकशाहीवर हल्ला; राज्यसभेतील गोंधळावरुन शरद पवार संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभेत पेगासस हेरगिरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी सरकारने विरोधकांनी सभागृहात उपस्थित मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारने विरोधी पक्षातील सदस्यांवर गैरतवर्तन केल्याचा आरोप केला.

या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्या १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर विमा संबंधी विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज संध्याकाळी ७.०४ पर्यंत अर्धा तास तहकूब करण्यात आले. गोंधळ घालणारे खासदार सभापतींच्या आसनाच्या अगदी जवळ आले आणि त्यांनी कागदपत्रे फाडली आणि हवेत आसनाकडे फेकून दिली.

या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त करत म्हंटल की, “आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत आज (राज्यसभेत) महिला खासदारांवर ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, ते  कधीही पाहिले नाही. ४० हून अधिक महिला आणि पुरुषांना बाहेरून सभागृहात आणण्यात आले. हे वेदनादायक आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे.

Leave a Comment