Paytm वॉलेटकडून पैसे न घेता Bank खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करावेत ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने गुगल प्ले स्टोअर वरून पेटीएम अॅप हटविले. अशा परिस्थितीत अनेक लोकं आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांबद्दल चिंता करू लागले आहेत. मात्र, पेटीएमने आपल्या सर्व युझर्सना खात्री दिली आहे की,’त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही.’ परंतु तरीही, जर आपणास असे वाटले की, आपण वॉलेटमधून पैसे काढून बँक खात्यात ट्रान्सफर करू इच्छित असाल तर त्यासाठी आपल्याला काही शुल्क भरावे लागेल. कारण ही सेवा फ्री नाही आहे. वॉलेटमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएम पैसे घेतो.

Paytm, PhonePAY, Payzapp सारख्या बर्‍याच मोबाईल वॉलेटमध्ये बँक खात्यातून पैसे जमा करणे, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड पूर्णपणे फ्री आहे, परंतु या वॉलेटमधून पैसे बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी, युझर्सना काही शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 2 ते 5% दरम्यान आहे.

पेटीएमकडून बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 3% चार्ज – पेटीएम त्याच्या वॉलेटमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सुमारे 3% चार्ज आकारते. आपण ट्रान्सफर केलेली रक्कमेतून 3% चार्ज म्हणून वजा केली जाईल. पूर्वी हा चार्ज 5% होता, परंतु आता तो कमी करून 3% करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर 2020 पर्यंत 3% वर पैसे ट्रान्सफर करण्याची संधी आहे. यानंतर हा चार्ज वाढू शकतो.

जर आपण ही पद्धत वापरली तर कोणतेही चार्ज कट केला जाणार नाही – युझर्स पेटीएम अॅपमधून UPI माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून कोणत्याही बँकेच्या कोणत्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. UPI मार्फत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएमला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. सर्व ई-वॉलेट कंपन्या UPI शी संबंधित आहेत. फ्री मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, आपली पेटीएम पूर्ण KYC व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. KYC व्हेरिफिकेशननंतर तुम्ही कोणतेही शुल्क न देता एका खात्यातून दुसर्‍या खात्यावर पैसे पाठवू शकता.

म्हणूनच शुल्क घेतले जाते – जेव्हा आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा बँक खात्यातून मोबाइल वॉलेटमध्ये पैसे जोडता तेव्हा मोबाइल वॉलेट कंपनीला त्या बँकेवर व्यवहार शुल्क म्हणून काही रुपये द्यावे लागतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे जोडता तेव्हा संबंधित बँकेलाही काहीतरी शुल्क द्यावे लागते. यासाठी ते ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेत नाही. पण जेव्हा एखादा ग्राहक वॉलेटमधून बँकेत पैसे ट्रान्सफर करतो, तेव्हा पेटीएम ग्राहकांना त्याची किंमत वसूल करण्यासाठी शुल्क आकारते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment