Whatsapp वर हा मेसेज होतो आहे व्हायरल, चुकूनही लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | व्हॉट्सॲप अल्पावधीत खूप लोकप्रिय झालेले ॲप आहे. लोकांना वापरायला सोपे असल्यामूळे लोकही याला पसंद करत आहेत. यावर मिळणाऱ्या मेसेजेसची संख्याही खूप असते. यामधे फसवणूक करणारे मेसेज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात.

डी मार्ट आपला वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट करणार असून, खूप लोकांना गिफ्ट मिळणार आहे. तुमचे गिफ्ट हवे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा. असे मेसेज व्हॉट्सॲपमध्ये सद्ध्या फिरत आहेत. यावर लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. पण हा मेसेज खोटा असल्याचे समजत आहे.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर एका स्पिन गेमचे पेज ओपन होते. त्यानंतर माहिती भरून घेतली जाते. यामुळे अनेक लोकांना फसवले जाण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. यामुळे अश्या संदेशापसून दूर राहा. यावर क्लिक करू नका अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like