औरंगाबाद प्रतिनिधी । उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या बारावी गुणपत्रकेवरील नापास किंवा अनुत्तीर्ण या अगोदरचा शेरा हद्दपार झाला आहे. तसेच विद्यार्थी परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास त्याला कौशल्य विकास पात्र असा शेरा दिला जात होता. मात्र नुकतेच महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी याबाबत सुधारित निर्णय जाहीर केला असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळ यांनी दिली आहेत.
शासनाने काढलेल्या निर्णयानुसार गुणपत्रिकावरील शेरा बदलणार आहे. कौशल्य विकासाला पात्र ऐवजी फेर परीक्षेला पात्र असा शेरा दिला जाणार आहेत. शासनाने काढलेल्या निर्णयानुसार बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारा हा एक महत्त्वाचा मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच पुढील आयुष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. यासाठी बारावीच्या परीक्षेत नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह दोन विषयात उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांकरिता फेरपरीक्षा मात्र असा शहरात देण्यात आला होता.
तसेच तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास पात्र असा शिरा देण्यात आला होता. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थिनी मित्र परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात उत्तीर्ण झाला असला तरी तो फेर परीक्षेसाठी पात्र ठरला जाणार आहे. अशी माहिती विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांनी दिली आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.