यंदा डॉ. आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावट

प्रशासनाकडून फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बुधवारी साजरी होत असून यानिमित्त निळे ध्वज, भीम तोरण, पताका आदींना मागणी वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने जयंतीनिमित्त नवीन कपडे खरेदी कसे करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निळे झेंडे, पताका आदी विविध वस्तूंना मोठी मागणी असते. हे लक्षात घेत व्यापा-यांनी टीव्ही सेंटर, सिटी चौक, पीरबाजार यासह शहरातील इतर बाजारपेठांत दुकाने थाटण्यात येते. दरवर्षी विविध आकाराचे निळे झेंडे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. यात पाव मीटरपासून ते पाच मीटरपर्यंतच्या आकाराच्या झेंडे उपलब्ध असतात. मात्र याहीवर्षी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने जयंतीनिमित्त नवीन कपडे खरेदी कसे करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने शहरातील पैठणगेट, गुलमंडी,  औरंगपुरा या भागातील दुकाने उघडण्याचे आवाहन केले होते. काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होते, मात्र पोलिसांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची मागणी व्यापारी महासंघाला केली. यामुळे उघडलेली दुकाने बंद करा, असे सांगण्यात आले. दुकाने उघण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून जिल्हाधिका-यांकडे निवेदनही दिले असल्याचे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

वाहनांना लावण्यात येणारे जयभीम तसेच पंचशील ध्वजांना यासह निळे पताका, कंदील यासह सजावटीच्या साहित्यांना मोठी मागणी असते.  दरम्यान, नवीन वस्त्र खरेदीसाठीही बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत असते पांढ-या वस्त्रांना विशेष मागणी ही असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजारपेठ गर्दीने फुलून जात असते, यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र यावर्षी प्रशासनाने फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने जयंतीची खरेदी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

You might also like