यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत.

होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही गाठींच्या माळा देण्याची पद्धत आजही पाळली जाते. पांढऱ्या शुभ्र गाठी घालून मिरवण्याची बच्‍चे मंडळीना खूप हौस असते.

होळीला पूरणपोळी, रंग, गुलाल, पिचकारी याचे जसे महत्त्व आहे तोच गाठीचाही मान आहे. त्यामुळे होळीला घरोघरी गाठीची खरेदी होतेच. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत तिथे खाऊ म्हणून होळीला गाठी पाठवतात. शिवाय वाग्दत्त वधूला मान म्हणून गाठीचोळी पाठवतात. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गाठीची खरेदी होतेच. गाठी गुढीपाडव्याला पूजेत वापरतात. त्यासाठी म्हणून गाठी घेतात. यंदा तर गाठीच्या भावात थोडी फार वाढ झाली असल्यानेही विक्री मंदावल्याचे चित्र आहे. त्यात कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादा यामुळे होळी सणावरही निर्बंध घालून हा सण साजरा करावा लागणार आहे.

आधूनिक तंत्रज्ञानाच्या सानिध्यात वावरत असलेल्या नव्या पिढीला गाठीचे महत्त्व तितकेसे वाटत नसावे, असे दिसून येते. फास्ट फूडची क्रेझ असणाऱ्या सध्याच्या चिमुकल्यांच्या गळ्यात होळीला गाठी विरळच दिसून येते, हेदेखील विक्री कमी होण्यामागील एक कारण असू शकते. शिवाय, आजकाल संदेश पाठवून शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. व्हर्च्युअल जगात समाज माध्यमांचा वापर वाढला असून ते मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरतात. होळी सणाचे संदेश मोबाइलवर खणखणत असताना गाठीचा खाऊ मात्र कुठेतरी हरविणार नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment