‘नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही’; खडसेंना काँग्रेसची ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकीत तिकीट डावलल्याने तसेच सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या भेटीसाठी दिल्लीला गेलेले खडसे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन परतले आहेत. त्यानंतर आता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत.

आपल्याला मिळणारी वागणूक आणि त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी खडसे दिल्ली दरबारी गेले होते. परंतु त्यांना वरिष्ठानी भेट नाकारल्याने त्यांना पवारांची भेट घेऊन माघारी परतावे लागले आहे. खडसेंच्या या भेटीगाठीच्या दौऱ्यावरुन काँग्रेसने खडसेंना उघडपणे ऑफर दिली आहे.

”नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अहवेलना झालेली आम्हाला देखील आवडलं नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसं पक्षात अली तर आनंदच होईल, पक्षाला बळकटी मिळेल, असे थोरात यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यातील भाजपा नेतृत्वावरुन खडसेंनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.त्यामुळे खडसेंच्या या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

Leave a Comment