अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत हे खरं की खोटं देशाला कळायला हवं – जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिकाला आलेली आहे. देशांतर्गत लसीचे उत्पादन करून जगात सर्वात मोठ्या लसी उत्पादक देशांमध्ये भारताची ओळख निर्माण करण्यास सिरम इन्स्टिट्यूटचा मोठा वाटा आहे. पण आता ही कंपनी भारताबाहेरील देशांमध्ये लस उत्पादन करण्याचा विचार करत आहे. लसीच्या पुरवठ्याबाबत वेळेचे आश्वासन पाळण्यात येत असल्याच्या अडचणीमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे अदार पूनावाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सोबतच त्यांनी, ‘भारतामध्ये मोठे- मोठे व्यक्ती त्यांना धमक्या देत असून, त्यांचे शिर कापण्यात येऊ शकते’ अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून, ‘याबाबत सत्यता काय आहे ते समोर यावे’ अशी मागणी केली आहे.

याबाबत वीट करताना जितेंद्र आव्हाड म्हणतात की, ‘सिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत अशी बातमी आहे . द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत,आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल. NDTV चे पत्रकार रविष कुमार यांनी सुध्दा या संदर्भात पोस्ट केली आहे …देशाला हे कळायला हव. #खरेकीखोटे’ यामुळे या प्रकरणांमध्ये आता राजकीय व्यक्तींनी ही बोलण्यास सुरुवात केल्यामुळे याबाबत गंभीर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.

 

 

गेल्या काही दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने आधार पूनावाला यांना वाय’ दर्जाची सिक्युरिटी देण्याची घोषणा केली होती. यानंतर सीआरपीएफ तुकडी त्यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे. यानंतर अदार पूनावाला हे लंडनला गेले अशी बातमी आली होती. तिकडे गेल्यानंतर त्यांनी ‘ द टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या बातमीमध्ये धक्कादायक खुलासा केला व त्यांनी त्यामध्ये म्हटले की, ‘मला धमक्या मिळत आहेत आणि सत्य बोललो तर माझे शिर कापले जाईल’ अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment