व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान मोदी, आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी ; मुंबई पोलिसांकडून एकाला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.

 

मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सातत्याने धमकीचे फोन तसेच ई-मेल येत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी आरोपीने दिली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने जे जे रुग्णालयही बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या आरोपीने मी कुख्ख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी (Police) हे प्रकरण गांभीर्याने घेतलं.

 

गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तिक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडकवण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतरही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासाबरोबर सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात.

 

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला. त्यानंतर चुनाभट्टी परिसरातून एका २९ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. कामरान खान, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने ही धमकी नेमकी कोणत्या उद्देशाने दिली, याचा तपास आझाद मैदान पोलिस करीत आहेत.