डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संबंध सर्वांनाच माहिती आहेत. या दरम्यान इराणने १ हजार ६५० किलोमीटर रेंजच्या एका क्रुज मिसाइलची निर्मिती केली असून रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह यांनी अमेरिकेला प्रमुख कमांडरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही ट्रम्पला मारू इच्छितो, असं मोठं विधान हाजीजादेह यांनी केलं आहे.

हाजीजादेह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांना मारू इच्छितो. १ हजार ६५० किमी रेंजच्या नव्या क्रूज मिसाइलला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या मिसाइल शस्त्रागारात समाविष्ट करण्यात आले आहे.

बगदादमध्ये २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानींचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसानतंर जेव्हा इराणने अमेरिकन नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक मिसाइलहल्ला केला. अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही ट्रम्पला मारू इच्छितो. माइक पॉम्पिओ आणि सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश देणाऱ्या सैन्य कमांडर्सना मारले पाहिजे, असे हाजीजादेह यांनी म्हटले.